मुंबई : ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घरोघरी पोचणारी अर्चना म्हणजेच अंकिता लोखंडे आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास तयार आहे. कंगना रानवत स्टारर ‘मणिकर्णिका’मध्ये अंकिता ‘झलकारीबाई’च्या भूमिकेत दिसणार आहे.
झलकारीबाई लक्ष्मीबाईची खास मैत्रीण होती. या चित्रपटातील अंकिताचा लूक रिलीझ झाला आहे. सोशल मीडियावर अंकिताला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पुढच्या २५ जानेवारी २०१९ मध्ये रिलीझ होणार आहे.