मुंबई: सध्या देशभरात निवडणुका सुरु आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केले जात आहे. यात अंगणवाडीचे कर्मचारी देखील आहे. मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाची सक्ती करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले आहेत. त्यामुळे हजारो अंगणवाडी सेविकांची निवडणुकीच्या कामामधून सुटका होणार आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाची सक्ती करू नये या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. त्या संबंधी मा. न्यायाधीश श्री अभय ओक व मा. न्यायमूर्ती श्री कर्णिक यांनी निर्णय दिला. महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर निवडणुकीच्या कामाची सक्ती करता कामा नये असे त्यांना आदेश दिले. निवडणुकीचे काम करू न इच्छिणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करता कामा नये. असे ही आदेश मा. न्यायमूर्तींनी दिले.