संप चिघळण्याची बनली दाट शक्यता बनली
मुंबई । गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेला अंगणवाडी कर्मचार्यांच्या संपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. सरकार संप मागे घेण्यासाठी ठोस आश्वासन देत नसल्याने संप चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, संप मागे घेतल्याशिवाय कोणत्याही वाटाघाटी होणार नाहीत, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत ज्या ज्यावेळी चर्चा झाली तेव्हा आश्वासन दिले. मात्र, पुढे काहीही झालेले नाही. त्यामुळे संप मागे घेणार नसल्याची भूमिका अंगणवाडी कर्मचार्यांनी घेतला आहे. त्यामुळे संप चिघळण्याची जास्त शक्यता आहे.
मानधनवाढीस प्रशासनाचा नकार
गतवर्षीप्रमाणे मानधनवाढ हवी असेल, तर संप मागे घ्या. संप मागे घेतल्याशिवाय कोणत्याही वाटाघाटी होणार नाहीत, असा पवित्रा घेत, महिला व बालविकास विभागाने घेतला. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत सुरू असलेल्या चर्चेला मंगळवारी ब्रेक लावला. मात्र, चर्चेसाठी बोलावून अशा प्रकारे नेत्यांचा पाणउतारा करणार्या प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने संप अधिक तीव्रतेने पुढे नेण्याचा इशारा दिला आहे.
संप मोडून काढण्याचा सरकारचा प्रयत्न
शिवसेना भवन येथे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रत्येक शिवसैनिक अंगणवाडी ताईंच्या पाठिशी उभा राहील, अशी खात्री दिल्याचे कृती समितीचे नेते दिलीप उटाणे यांनी सांगितले. उटाणे सांच्यासोबत कृती समितीचे एम.ए. पाटील, शुभा शमीम, भगवान देशमुख या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. सरकार अंगणवाडी कर्मचार्यांचा संप मोडून काढण्याचा प्रयत्न करत असल्याची भावना यावेळी कृती समितीच्या नेत्यांनी मांडली. मात्र सरकारविरोधात प्रत्येक शिवसैनिक अंगणवाडी कर्मचार्यांच्या पाठिशी असल्याचे ठाकरे म्हणाले.