अंगणवाडी सेविकांचा सन्मान

0

चिंबळी : जागतिक महिलादिना निमित्त निघोजे येथे ग्रामपंचायतीच्या वतीने खेड तालुक्यातील कुरूळी बिट मधील अगंणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात आला.यावेळी खेड तालुका पंचायत समितीच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका आशा खेडेकर, उपसंरपच आशिष येळवंडे, ग्रामसेवक विजेय भंडारे यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी ग्रा.पं.सदस्या सुनिता शिंदे,नम्रता येळवंडे, सुजाता फडके, रिठाबाई सोनवणे, रूपाली येळवंडे,अलका पाडेकर, वृषाली पानसरे व सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पर्यवेक्षिका आशा खेडेकर यांनी अंगणवाडी सेविका पवना जामदार,मनीषा येळवंडे,लता फडके,लिलाबाई कोळेकर, कांता येळवंडे, गायत्री लोखंडे, शोभा परदेशी, लता काळोखे, अनिता बागडे, लक्ष्मीबाई कड, रेखा सोनवणे, मिनाक्षी खराबे, सुनिता सोनवणे, मुक्ता शिळावणे,अलका खराबे.,नंदा जैद,कल्याणी नाणेकर,वंदना जाधव,मनिषा फलके,करीश्मा साळवे,सरस्वती सोनवणे,अश्‍विनी सोनवणे,सिमा विधाटे,यांचा सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या.