अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ व्हावी

0

नारायणगाव : अंगणवाडीच्या सेविका खुप कष्टाने व जबाबदारिने काम करतात शासनाने त्यांच्या मानधनात वाढ करणे आवश्यक आहे. पुढील वर्षी जिल्हा परिषद शाळांच्या माध्यनातुनही अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जि.प.सदस्य शरद लेंडे म्हणाले.

जुन्नर तालुक्यातील नगदवाडी येथील अंजली मंगल कार्यालयात एकात्मिक बाल विकास सेवा योजना नारायणगाव अंतर्गत पिंपळवंडी नं.2 बिटामधील 27 अंगणवाड्यांचा बाल आनंद मेळावा जि.प.सदस्य शरद लेंडे, पं.स.सदस्य शाम माळी, सरपंच विक्रम भोर, सरपंच माऊली शेटे अशा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.

बालकलाकारांनी केले विविध गुणदर्शन
यावेळी कादळी वडगावचे सरपंच विक्रम भोर यांनी या कार्यक्रमासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने सहकार्य करुन मुलांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करत भोर यांनी स्वत: ग्रामपंचायत मार्फत पुढील पाच वर्षांसाठी प्रत्येक वर्षी दहा हजार देण्याचे आश्‍वासन दिले. या कार्यक्रमात बाल कलाकारांनी आपले कलागुण सादर केले. यावेळी पुर्वा संजय जाधव या विद्यार्थीने शिवाजी महाराज याविषयावर केलेल्या भाषणाचे मान्यवरांनी कौतुक करत तिचा सत्कार करण्यात आला.