अंगणवाडी सेविका मनीषा माळी पुरस्काराने सन्मानित

नंदुरबार। न्याहली येथील अंगणवाडी सेविका मनीषा माळी यांना नुकतेच आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय महात्मा ज्योतीबा फुले युवा मंच आयोजित क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण सोहळा नुकताच शहादा येथे झाला. या कार्यक्रमात न्याहली येथील अंगणवाडी सेविका मनीषा माळी यांना जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया गावित यांच्या हस्ते आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

यावेळी आ. विजयकुमार गावित, उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, ईश्वर माळी, ईपीएस पेन्शनर संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोरख माळी, सामाजिक कार्यकर्त्या उषाबाई माळी आदी उपस्थित होते. आदर्श शिक्षिक पुरस्कार मिळाल्याबद्दल मनीषा माळी यांचे ग्रामस्थांतर्फे सर्वत्र कौतुक होत आहे.