मुक्ताईनगर- तालुक्यातील सातोड येथील विवाहितेच्या अंगावर झाड पडल्याने त्या खाली दबले जावून तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास सातोडा शिवारातील गट नंबर 175/2 मधील शेतात घडली. अंजनाबाई ज्ञानेश्वर सूर्यवंशी (37, सातोड) असे मयत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी गोविंदा नथ्थू गवळी, 48, (पिंप्री अकराऊत) यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार माणिक निकम करीत आहेत.