अंगावर भिंत पडल्याने बालीका ठार

0

जामनेर। तालुक्यातील सामरोद येथील साडेचार वर्षीय बालीकेच्या रिमझीम पावसामुळे अंगावर भिंत पडून जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. लावण्या विकास वखरे ही बालीका घरात दुपारी दोन वाजेच्या सुमारास झोपेतून उठून बाहे येत असतानाच घराची मातीची भिंत तिच्या अंगावर पडल्याने डोक्याला व छातीला जोरदार मार बसल्याने लावण्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. जामनेर येथे उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉ.चांदाने त्यास मृत घोषीत केले.

याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला डॉ.चांदा यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास जालमसिंग पाटील करीत आहे.