अंजली दमानियांना रावेर न्यायालयाने सुनावला पाचशे रुपये दंड

0

माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे बदनामी प्रकरण ; 25 जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश

रावेर- भारतीय जनता पक्षाची व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी रावेर येथे भाजपा पदाधिकारी सुनील पाटील यांनी खटला दाखल केला आहे. अंजली दमानिया यांनी एप्रिल 2018 पासून न्यायालयात जामिन दिला नसल्याचे तक्रारदाराचे वकील अ‍ॅड.चंद्रजीत पाटील यांनी न्यायालयास निदर्शनास आणून दिल्यानतंर न्या.आर.राठोड यांनी अंजली दमानिया यांचा अर्ज फेटाळून 500 रुपयांचा दंड देखील ठोठावला तसेच पुढील सुनावणी 25 जानेवारी 2019 रोजी होणार असून त्यावेळी न्यायालयात हजर राहण्याबाबत बजावले.