अंजाळेजवळ गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त

0

44 हजारांचे रसायन नष्ट ; यावल पोलिसांची कारवाई

यावल- यावल पोलिसांनी रविवारी गावठी हात भट्टी दारू पाडणार्‍यांवर कारवाई करीत 44 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला. अंजाळे गावाजवळील तापी नदीकाठी पहाटे ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान दोन संशयीत पसार झाले. रविवारी अंजाळे गावाजवळील तापी नदीच्या पात्रात अवैध गावठी हातभट्टीची दारू अवैद्यरित्या पाडली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी, उपनिरीक्षक दीपक ढोमणे, सहाय्यक फौजदार अजीज शेख, नागपाल भास्कर, विकास सोनवणे, जाकीर शेख, शामकांत धनगर आदींच्या पथकाने पहाटे ही कारवाई केली. ईश्वर लक्ष्मण सपकाळे व डिगंबर विलास सपकाळे हे दोन वेगवेगळ्या ठिकाणी दारूची भट्टी लावतांना आढळले. 44 हजारांचे रसायन जागेवरच पोलिसांनी नष्ट केले.

सावतर निंभोर्‍यात 31 हजारांचे रसायन नष्ट
वरणगाव- येथून जवळच असलेल्या सांवतर निंभोरा शिवारातील तापी नदी काठी गावठी हातभट्टी रविवारी सकाळी साडेआठ वाजता वरणगाव पोलिसांनी धाड टाकून 31 हजार रुपयांचे रसायन नष्ट केले. आरोपी मात्र पसार होण्यात यशस्वी झाला. सावतर निभोंरा येथील रहिवासी मुकेश पुंडलीक कोळी हा तापी नदीकाठी रसायनमिश्रीत गावठी हातभट्टी निर्मिती करीत असतांना पोलिसाना गुप्त माहिती मिळाल्याने वरणगाव पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सारीका कोडापे, हवालदार नागेंद्र तायडे, राजेंद्र सोनार, मेहरबान तडवी, अतुल बोदडे आदींनी धाड टाकून कच्चे रसायन व गावठी हातभट्टी नष्ट केली.