यावल : गत आठवड्यात यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळील अंजाळे घाटात काही ट्रक चालकांवर दगडफेक करून त्यांना लुटण्यात आल्याची घटना घडली होती तर ही घटना ताजी असतानाच रविवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास काही चोरट्यांनी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास काही चोरट्यांनी पुन्हा शहादा तालुक्यातील डोंगरगावचे ट्रक चालक विजय भगवान पाटील (25) हे ट्रक (क्रमांक एम.एच.18 बी.जी. 8874) घेवून अहमदाबादहून नागपूरला यावलमार्गे जात असताना अंजाळे घाटात 25 ते 30 वयोगटातील आरोपींनी ट्रकवर दगडफेक करीत विजय पाटील यांच्या खिशातून दोन हजार रुपये काढून पोबारा केला होता. याबाबत यावल पोलिसांना माहिती दिल्यानंतर यावल पोलिसांनी अंजाळे शिवारातील जंगलातून चौघांना अटक केली.
अनेक गुन्ह्यांचा उलगडा होणार
ट्रक चालक विजय पाटील यांना लुटल्यानंतर यावल पोलिसांनी अंजाळे शिवारातील जंगलातून चौघांना अटक केली. यावल पोलिस निरीक्षक अरुण धनवडे, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांच्यासह सहाय्यक फौजदार मुजफ्फर खानख, पोलीस कर्मचारी असलम खान, निलेश वाघ, विनोद खांडोबारे, संजय देवरे, गोरख पाटील, पोलिस वाहन चालक ईस्माईल तडवी यांनी आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग करून ही कारवाई केली. आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.