अंजुमन खिदमत-ए-खल्क ट्रस्टच्यावतीने मुस्लीम सामूहिक विवाह

0

अंबरनाथ । अंजुमन खिदमत-ए-खल्क ट्रस्टच्या वतीने अंबरनाथमध्ये प्रथमच कोहोजगाव येथील हजरत गैबन शाह वली दरगाह मैदानात मुस्लिम सामुहिक विवाह आयोजित करण्यात आले. या सामूहिक मुस्लिम विवाह सोहळ्यात रत्नागिरी, गुजरात, मुंब्रा, बदलापूर, अंबरनाथ, सोलापूर, आदी शहरातील गोर गरीब मुस्लिम सात जोडप्यांनी आपली नावे नोंदणी केली होती असे असल्याची ट्रस्टचे अध्यक्ष तनवीर शेख यांनी सांगितले.

अंबरनाथमध्ये प्रथमच अंजुमन खिदमत-ए-खल्क ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या या सामुहिक विवाह सोहळ्यास अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, अंबरनाथ मुस्लिम जमातीचे अध्यक्ष हाजी सलीम चौधरी, शौकतअली शेख, आरिफ काजी, जुबेर शाह, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील, नगरसेवक, विलास हरिभाऊ जोशी, किरण कांगणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजीत गुलाबराव करंजुले-पाटील, उद्योगपती विश्‍वनाथ पनवेलकर, अंबरनाथ व्यापारी संघाचे अध्यक्ष खानजी धल, कल्याणचे अब्दुलबाबा, हाजी सईद बाबू, नजीर शेख, ख्वाजाभाई चौधरी, अंबरनाथ नगरपरिषदेचे स्वच्छतादूत सलील जव्हेरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी वधू-वरांना भेटी देऊन वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अंजुमन खिदमत-ए-खल्क ट्रस्टच्या वतीने वधू-वरांना संपूर्ण संसारिक साहित्य दिलेले असून हा सोहळा यशस्वी करण्याकरिता अध्यक्ष हाजी तनवीर शेख, हाजी कादर चौधरी युसूफ शेख आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मेहनत घेतली.

प्लास्टिकमुक्तीचा दिला संदेश
स्वच्छ भारत अभियान, एक पाऊल स्वच्छतेकडे या अभियानाअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या माध्यमातून अंजुमन खिदमत-ए-खल्क ट्रस्टच्या वतीने या पुढे कोणीही प्लास्टिकच्या पिशव्या न वापरता कापडी पिशव्या वापराव्यात. व पर्यावरण संतुलन ठेवावे, असा संदेश या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या नागरिकांना दिला. यावेळी नववधु-वराचे नातेवाईक आणी मान्यवरांना सुमारे 1000, कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले असे ट्रस्टचे अध्यक्ष तनवीर शेख यांनी सांगितले.