अंडर 19 विश्‍वचषक चौथ्यांदा भारताकडे

0

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 8 गड्यांनी पराभव
मांऊट माऊंगानूई- अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 8 गड्यांनी पराभव करीत भारताच्या अंडर 19 संघाने चौथ्यांदा विश्‍वचषकावर नाव कोरले आहे.  भारतीय क्रिके्रटमध्ये द वॉल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या संघाने हा पराक्रम केला आहे. अंतिम सामन्यात मनजोत कालरा याने धडाकेबाज शतक ठोकले. त्याने 102 चेंडूत 101 धावा केल्या. त्याला देसाईने उत्तम साथ दिली. सुरूवातील ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जेसन संघ याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चौथ्या विश्‍वचषक विजयासाठी ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 217 धावांचे आव्हान ठेवले आहे.भारताकडून इशान पोरेल, शिवा सिंह, कमलेश नागरकोटी आणि अनुकूल रॉय यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. शिवम मवीने एका फलंदाजाला माघारी धाडलं.ऑस्ट्रेलियाकडून जोनाथनने 102 चेंडूत 76 धावांची अर्धशतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 217 धावांचे आव्हान भारतीय संघाने 38.5 व्या षटकात पूर्ण केले. या आधी भारतीय संघाने 2000, 2008, 2012मध्ये विश्‍वचषक जिंकला आहे. आता पृथ्वी शॉच्या कर्णधारपदात हा विश्‍वचषक जिंकला आहे.