अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावरील चित्रपटात शाहरुख खान असणार मुख्य भूमिकेत

0

मुंबई-भारतातील पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात किंग खान शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे निर्माते रोनी स्क्रूवाला यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होणार आहे. ‘सारे जहां से अच्छा’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. यात शाहरुख खान राकेश शर्मा यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री म्हणून मुख्य भूमिकेत भूमी पेंडणेकर असणार आहे.