अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणारच, फेरविचार नाही: युजीसी

0

नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॉलेज बंद आहे, त्यामुळे साहजिकच अद्याप परीक्षा झालेल्या नाही. दरम्यान आता युजीसी (विद्यापीठ अनुदान आयोग)ने परीक्षा घेण्याबाबतचे आदेश दिले आहे. त्यामुळे विद्यापीठांना परीक्षा घेणे क्रमप्राप्त आहे. युजीसीचा आदेश विद्यापीठांसाठी अंतिम आहे. मात्र महाराष्ट्रसह अनेक राज्यांमध्ये परीक्षा घेण्याविषयी संभ्रमावस्था आहे. परंतु विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे महत्त्वाचे आणि आवश्यक आहे असे मत युजीसीचे सचिव प्रा.रजनीश जैन यांनी व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन परीक्षा घेण्याबाबत राज्यांनी आवश्यक तयारी करावी असेही त्यांनी सांगितले आहे.

युजीसीचे आदेश अंतिम
युजीसीने दिलेले आदेश विद्यापीठांसाठी अंतिम असतात असे युजीसीचे उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन यांनी सांगितले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी परीक्षा विषयी मत मांडले. एप्रिलपासून आतापर्यंत राज्य सरकारने परीक्षा घेण्यासंदर्भात विचार केला पाहिजे होता. परीक्षा कशा पद्धतीने घेता येतील याचा विचार सरकारने करायला हवे होते. मात्र तसे झालेले नाही अशी खंत डॉ.पटवर्धन यांनी म्हटले आहे. परीक्षा घेण्याच्या निर्णयावर फेरविचार व्हावा अशी मागणी केली जात आहे, मात्र यावर फेरविचार होणार नाही असेही डॉ.पटवर्धन यांनी म्हटले आहे.