जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (बॅकलॉगसह) विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अनुषंगाने विकल्प अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी १७ सप्टेंबर, २०२० पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
विद्यापीठाने एम.के.सी.एल. द्वारे विकसित DU Portal (विद्यापीठाच्या http://numj.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर) विद्यार्थ्यांच्या ई-सुविधा अकांउट मध्ये विकल्प पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यापुर्वी १५ सप्टेंबर अंतिम मुदत होती. मात्र विद्यार्थ्यांना येत असलेल्या तांत्रिक अडचणींचा विचार करता विद्यापीठाने १७ सप्टेंबर पर्यंत मुदत वाढवून दिली आहे.
विकल्प अर्ज भरून देणेसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या http://numj.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर जाऊन ई-सुविधा अकाऊंटमध्ये Willingness to Appear in Exam या Link ला Click करून विकल्प सादर करायचा आहे. विकल्प सादर करतांना अडचणी आल्या विद्यार्थी सहाय्यता केंद्राच्या ०२५७-२२५८४१८ या क्रमांकावर अथवा भ्रमणध्वनी क्रमांक ९४०३००२०१५, ९४०३००२०१८, ९४०३००२०२४, ९४०३००२०४२, ९४०३००२०५४, ९४०३००२०८२ वर संपर्क साधावा. अथवा sfc@nmuj.digitaluniversity.ac.in वर मेल करावा. असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी केले आहे.