अंतुर्ली- गावातील आंबेडकर चौकातील मोबाईल दुकान जाळण्याचा प्रयत्न झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. 6 रोजी मध्यरात्री ही घटना घडल्यानंतर दुकानमालकास याची माहिती मिळताच त्याने धाव घेत आग विझवली. या प्रकारात एक ते दोन हजार रुपयांचे नुकसान झाले. आंबेडकर चौकात नितीन सावकारे यांचे मोरया मोबाइल दुकान असून दुकानाच्या बाहेरील भागाला अज्ञात समाजकंटकाने जाळण्याचा प्रयत्न केला. बाहेरील भाग जळत असल्याचे रस्त्याने जाणार्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सावकारे यांना सांगताच त्यांनी धाव घेत आग विझवली.