अंतुर्ली दंगल, 9 जणांविरुद्ध गुन्हा

0
घर बांधण्यावरून दुट्टेवाड्यात उफाळला वाद ; तुंबळ हाणामाारीत मुलासह आई जखमी
अंतुर्ली :- गावातील दुट्टेवाड्यात घर बांधण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी होवून मुलासह आई जखमी झाल्याची घटना 9 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी नऊ संशयीत आरोपींविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी शुभम मधुकर दुट्टे (18, शिक्षण शिवाजी नगर, दुट्टे वाडा, अंतुर्ली) यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी साहेबराव शंकर दुट्टे, सुनीता साहेबराव दुट्टे, अमोल साहेबराव दुट्टे, सदाशीव शंकर दुट्टे, संजय ओंकार दुट्टे, प्रमोद ओंकार दुट्टे, रुपाली संजय दुट्टे, सुनीता धनराज महाजन, सरस्वती ओंकार दुट्टे, (सर्व राहणार शिवाजी नगर, अंतुर्ली) यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी घर बांधण्याच्या कारणावरून वाद घालत तक्रारदारासह त्याच्या आईला चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तपास निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय नरसिंग चव्हाण करीत आहेत.