अंत्योदय कर्ज योजना जाहीर

0

जळगाव । बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अविनाश आचार्य यांनी घालून दिलेल्या आदर्शांवर बँकेची प्रगती सुरु असून समाजातील शेवटच्या घटकाला सक्षम करण्याचा बँकेचा आहे. बँकेच्या प्रगतीत बँकेचे स्थापनेपासूनचे सर्व संचालक, सभासद व कर्मचारी यांचे मोठे योगदान असल्याचे सुतोवाच जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव यांनी 4 जून रविवार रोजी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले. संत बाबा हरदासराम समाज मंदिरात आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा 1600 सभासदाच्या उपस्थिती मध्ये उत्साहात संपन्न झाली.विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलीक पाटील यांनी केले व संचालक जयेश दोशी, सुभाष लोहार, कृष्णा कामठे, सुरेश केसवाणी, जयंतीलाल सुराणा, विवेक पाटील, सतिष मदाने, डॉ. आरती हुजुरबाजार, रविंद्र बेलपाठक, हरिशचंद्र यादव,सावित्री साळुंखे यांनी विविध विषयांचे वाचन केले व त्यास उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.

शाखा व कर्मचार्‍याचा सन्मान
उत्कृष्ट कार्य करणा-याचा गुण गौरव उपाध्यक्ष डॉ.प्रताप जाधव यांनी केला. यात उत्कृष्ट ठेव संकलन शाखा भुसावळ,उत्कृष्ठ कर्ज वितरण शाखा,गणेश कॉलनी,उत्कृष्ठ वसुली शाखा,अंमळनेर,उत्कृष्ठ शाखा मार्केट यार्ड,जळगाव यांना गौरविण्यात आले. तर गुणवंत कर्मचा-यांमध्ये श्री अशोक सोनवणे,व्यवस्थापक,दाणा बाजार शाखा ,श्री सुरेश सोनवणे,सहाय्यक,मुख्य कार्यालय तसेच श्री मधुकर चौधरी यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन,मुंबई यांच्या वतीने कै.बापुरावजी देशमुख उत्कृष्ठ सहकारी बँक कर्मचारी पुरस्कार मिळाल्याबद्दल व श्री शरद भालेराव यांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्राची भव्य रांगोळी रेखाटण्यासाठी लिम्का बुक आफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल बँकेतर्फे सत्कार करण्यात आला तसेच सेवानिवृत्त कर्मचारी श्री अशोक माटे,श्री राजेंद्र देशपांडे,श्रीमती ताराबाई पवार यांना निरोप देण्यात आला.

बँकेच्या प्रगतीसाठी योगदान देणार्‍याचे आभार
आपल्या अध्यक्षीय मनोगतात श्री अनिल राव यांनी बँकेच्या सभासदांसाठी नवीन योजनांची घोषणा केली. यात बँकेच्या अंत्योदय कर्ज योजनेतंर्गत शेतकरी कुटुंबातील युवक अथवा युवती तसेच बारा बलुतेदार व ग्रामीण भागातील बचत गटांना शेती पूरक व्यवसायासाठी तसेच इतर व्यवसासाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाईल असे जाहीर केले निश्चलणीकरणानंतर उत्पन्न झालेल्या स्थितीतही आपल्या बँकेने साधलेल्या उतुंग प्रगतीसाठी त्यांनी सर्व सभासद,ग्राहक,हितचिंतक व कर्मचार्यांचे अभिनंदन केले.तर बँकेचे उपाध्यक्ष डॉ. प्रताप जाधव यांनी मनोगतात बँकेची प्रगती व त्यातील विविध टप्प्यांचा उहापोह केला.नोट बंदीच्या काळात निर्माण झालेल्या वातावरणावर मात करत बँकेचे सभासद,ग्राहक व कर्मचारी यांच्या मुळेच बँकेला प्रगतीची गगनभरारी घेता असे त्यांनी सांगितले. दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली यात बँकेचे माजी उपाध्यक्ष अविनाश शर्मा ,बँकेचे आजी व माजी कर्मचारी व इतर मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अपर्णा महाशब्दे यांच्या वंदेमातरम् ने सभेची सुरुवात केली. तर सभेचे सूत्रसंचालन संचालक डॉ.अतुल सरोदे यांनी केले.

सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार
बँकेने समाजातील विविध स्तरावर कार्य करणा-या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार केला यामध्ये सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील,कुलगुरू डॉ.प्रदीप पी.पाटील, महापौर नितीन लढ़ढ़ा,विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी,जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन,केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर ,सहकार भारतीचे संजयजी बिर्ला, शिवाजीराव भोईटे,सपना श्रीवास्तव यांचा सत्कार करण्यात आला