पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2018-19 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी (दि.26) दुपारी दोन वाजता विशेष महासभेचे आयोजन करण्यात आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेचा सन 2018-19 या आर्थिक वर्षांचा मूळ 3500 कोटी तर जेएनएनयूआरएमसह 5235 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प गुरुवारी स्थायी समितीला सादर केला. त्यानंतर कालच स्थायी समिती सदस्यांनी अर्थसंकल्पावर चर्चा केली. त्यामध्ये उपसुचनांद्वारे 27 कोटी रुपयांची वाढ केली. त्यामुळे पालिकेचा अर्थसंकल्प 5262.30 कोटींवर पोहचला आहे. त्यानंतर स्थायी समितीने अर्थसंकल्पाला गुरुवारीच मंजुरी दिली आहे.
महापौर नितीन काळजे यांनी सोमवारी (दि.26) विशेष महासभा घेण्याबाबत नगरसचिव कार्यालयाला पत्र दिले आहे. सोमवारी दुपारी दोन वाजता अंदाजपत्राकवरील चर्चेसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून अंदाजपत्रक मंजुरीसाठी मांडण्यात आले आहे.