चाळीसगाव । छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय समता सन्मान संमेल्लन धुळे येथील कल्याण भवनात 2 जुलै रोजी पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. चाळीसगाव येथील अंधशाळेचे विशेष शिक्षक सचिन सोनवणे यांना फुले, शाहू, आंबेडकर राष्ट्रीय लोक मित्र पुरस्कार 2017 ने सन्मानित करण्यात आले. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय समता सन्मान संमेलन घेण्यात आले.
राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राष्ट्रीय अंधशाळेतील शिक्षक सचिन सोनवणे यांचा फुले,शाहू, आबेडकर राष्ट्रीय लोकमित्र पुरस्काराने गौरव करण्यात आला. 2017 ने सन्मानित करण्यात आले. महापौर कल्पना पाटील, धुळ्याच्या कन्या मिस इंडिया समर दिपीका पाटील, पुरस्कार चळवळीचे राष्ट्रीय नेते जयेंद्र खुणे, पनवेलच्या महिला बालकल्याण सभापती नीता माळी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी शहनाज खान, सीमा गांगुली, विजय मानमोडे, सारिका पाटील, रेखा महाजन, अतुल पाटील, गायक संतोष चौधरी, जगदीश पाटील, डॉ.श्रीकृष्ण बेडसे आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ.एम.बी.पाटील, अरुण निकम, उपाध्यक्ष डॉ.संजय देशमुख, संजय रतनसिंग पाटील आदींनी व शाळेच्या मुख्याध्यपिका प्रभा मेश्राम, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.