अंधारी येथे एकाचे डोके फोडले

0

चाळीसगाव – पत्नीच्या पायावरुन मोटारसायकलचे चाक गेल्याचे विचारल्यावरुन एकास मारहाण करुन डोके फोडल्याची घटना दिनांक ७ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तालुक्यातील अंधारी येथे घडली असुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी, तालुक्यातील अंधारी येथील तानाजी झिपरु वाघ (वय- ४३) यांच्या पत्नीच्या पायावरुन आरोपी गोरख हिरामण वाघ रा अंधारी याची मोटारसायकल गेल्याने त्याबाबत बोलण्यास गेल्याचा राग येवुन दिनांक ७ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अंधारी गावी त्यांच्या घरासमोर आरोपी गोरख हिरामण वाघ, हिरामण बंडु वाघ, ईंदुमती हिरामण वाघ यांनी चापटा बुक्यांनी मारहाण करुन हिरामण बंडु वाघ याने त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजुस दगड मारुन जखमी केले व तिघांनी त्यांच्या पत्नीस शिवीगाळ करुन ‘तु एकटा भेटला तर तुझे हात पाय तोडुन टाकु’ अशी धमकी दिल्याप्रकरणी वरील तिघा आरोपीविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक फौजदार हिरामण तायडे करीत आहेत.