अंध, अपंग, विधवा, वृध्द व्यक्ती लाभापासुन वंचित

0

शिरपुर । शिरपुर, शिंदखेडा, साक्री व धुळे तालुक्यातील अंध, अपंग, विधवा, वृध्द, निराधार, भुमिहीन, गोरगरीब, आदिवासी, दलित यांना गेल्या चार ते पाच महिन्यापासुन इंदीरा गांधी योजनेतील वंचित लाभार्थींना अनुदान मिळावे अशी मागणीचे निवेदन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना.राजकुमार बडोले,राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना बुधवार 20 जून रोजी मंत्रालयात देण्यात आले.

चार ते पाच महिन्यांपासून अनुदान बंद
भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा मार्गदर्शनाखाली भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले,राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडे निवेदन देवुन लाभार्थी वंचिताना अनुदान मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजपा अनु.जाती मोर्चा धुळे जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार उपस्थित होते.लाभार्थींना पुर्वी वेळेवर अनुदान मिळत होते.मात्र आता चार ते पाच महिन्यापासुन संबंधित लाभार्थी अनुदानापासुन वंचित आहेत.लाभार्थी जेव्हा बॅकेत पैसे काढण्यासाठी जातात व खात्यात पैसे नाहित म्हणुन निराश होवुन परतात.अनुदानाअभावी लाभार्थी चार ते पाच महिन्यापासुन लाभापासुन वंचित आहेत.तरी आपण आपल्यास्तरावरुन लाभार्थींना लाभ मिळण्यासाठी योग्य तो निर्णय व्हावा अशी मागणी मंत्री राजकुमार बडोले,राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचाकडे भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी केली आहे.