अंध शाळेतील मुलांसोबत पर्यावरणपूरक होळीचा आनंद

0

चाळीसगाव । रोटरॅक्ट क्लब व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सयुक्त विद्यमानाने होळी सेलेब्रेशन निरागस अंध शाळेतील मुलांसोबत केले. मुलांनी गटकार्य करून आवारातून कचरा एका जागी संकलित केला व पर्यावरणपुरक होळीचा एक वेगळा आनंद साजरा केला.

तसेच अंध मुलांसोबत सत्संग, ध्यान व स्वच्छतेचे महत्व सांगूण कार्यक्रम केला. यावेळी रोटरॅक्ट क्लब अध्यक्ष राहूल वाकलकर, सेक्रेटरी मानसी कटारिया, सदस्य योगेश पाटील, चेतन चौधरी, सागर पल्लन, अजय भावसार, तक्षक ठोंबरे, चंद्रशेखर विसपुते, प्रेरणा रोकडे,जितेंद्र निकम, कुलदिप चौधरी, अक्षय कापडणे, शिक्षक संजय घोडेराव व दिपक पाटील उपस्थित होते.