अंनिसतर्फे सर्प प्रबोधन सप्ताहाचे आयोजन

0

तळोदा । अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने सर्प प्रबोधन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात सर्प विज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दरवर्षी नागपंचमी निमित्ताने सर्प प्रबोधन सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन समितीच्यवतीने करण्यात आले आहे. दरम्यान, यानिमित्ताने सर्व प्रकारचे सर्प, त्यांच्या बाबतच्या अंधश्रद्धा सर्पदंश व त्यावरील उपचार याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सर्पदंशासह इतर बाबींची मिळणार माहीती
मोठ्या डिजिटल पोस्टरवर विषारी, सैम्य विषारी, बिनविषारी अश्या सर्व प्रकारच्या सर्पाचे चित्र दाखवून त्याबाबत तपशिलात माहिती देण्यात येणार आहे. सर्पदंश झाल्यावर करावयाचे प्रथमोपचार, सर्प दंश होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी अश्या सर्व बाबींचे प्रबोधनादेखील समितीच्या मार्फत या सप्ताहात केले जाणार आहे. अनेक ठिकाणी प्रोजेक्टरच्या साहाय्याने हि माहिती विद्यार्थापर्यंत पोहचवली जाणार आहे. आज नागपंचमीच्या दिवशी जिल्ह्यात या अभियानास सुरुवात झाली असून पुढचे सात दिवस हे अभियान राबविण्यात येणार आहे. शाळांमध्ये सर्प प्रबोधन साप्ताहाअंतर्गत कार्यक्रम आयोजीत करायचा असेल त्यांनी अंनिसच्या स्थानिक शाखेशी संपर्क करावा, असे आवाहन आले आहे. सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडू घोडे,प्रवीण महिरे, निलेश सावळे, आशिष तायडे, भारती पवार, सुभाष भुजबळ, फुंदीलाल माळी सहकार्य करीत आहे.