अंनिसतर्फे 20 ऑगस्टपर्यंत ‘जबाब दो’ आंदोलन..

0

शिंदखेडा। तीन वर्षात समितीने दोन कायदे मंजूर करून घेतले. कार्यकर्ता, पदाधिकारी यांच्या चिकाटी व प्रामाणिक तळमळीचे फलीत आहे, असे प्रतिपादन राज्य उपाध्यक्ष डॉ.रवींद्रनाथ टोणगावकर यांनी शिंदखेडा येथील येथील स्वामी समर्थ विद्यालयात अंनिसची जिल्हा बैठकीत केलेे.

बैठकीत शिंदखेडा, शिरपूर, साक्री, धुळे शाखेच्या आढावा घेण्यात आला.

तरुणांसाठी प्रशिक्षण शिबिराचे नियोजन
दुपारच्या सत्रात तन्वी परेश हिच्या चळवळीच्या गाण्याने सुरूवात करण्यात आली. डॉ.नरेंद्र दाभोळकरांच्या खूनाला चार वर्ष पूर्ण होत असून अद्याप शासनाला मारेकरी, सूत्रधार यांचा तपास लागत नाही. म्हणून शासनाच्या प्रतिनिधींना प्रश्न विचारण्यासाठी ‘जबाब दो आंदोलन‘ 20 ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे. बैठकीत ‘हिंसा के खिलाप मानवता की ओर‘ ही संकल्पना व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा लोकापर्यत पोहोचवणे. वार्तापत्राचे येत्या 15 दिवसात 500 वर्गणीदार करणे, शिरपूर येथे महाविद्यालयीन तरुणांसाठी प्रशिक्षण शिबिराचे नियोजन करण्यात आले. शिरपूर, शिंदखेडा, निमगूळ, धुळे आदी ठिकाणचे कार्यकर्त उपस्थित होते. अ‍ॅड. बोरसे यांनी नव्यानेच झालेल्या सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याविषयी माहिती दिली.

जेष्ठ कार्यकर्ते अशोकभाई शाह, राज्य सरचिटणीस प्रा.परेश शाह, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.सुरेश बिर्‍हाडे, सचिव प्रा.दीपक बाविस्कर, अ‍ॅड. विनोद बोरसे, दिलीप खिवसरा, हरीचंद्र लोंढे, शंकर सगरे, देविदास सोनवणे, मोहन सोनवणे, कार्याध्यक्ष भिका पाटील, सचिव प्रा. दीपक माळी, प्रा. सतिष पाटील, सुरेश बोरसे, रणजित शिंदे, संदीप गिरासे, विकास वाघ, देवेंद्र नाईक, प्रबोध शाह यांच्यासह विविध शाखेचे कार्यकर्ते उपस्थित होते.