जालना : जालना जिल्ह्यातील अंबड नगरपरिषदेच्या भाजपच्या नगराध्यक्षा संगीता कुचे यांचं नगराध्यक्षपद तिसर्या अपत्याच्या तक्रारीमुळे धोक्यात आले आहे. अंबड नगरपरिषदेच्या भाजप नगराध्यक्षा संगिता कुचे यांना तीन अपत्य असून त्यांचे तिसरे अपत्य हे 12 सप्टेंबर 2001 या कट ऑफ डेटनंतर झाल्याची तक्रार काँग्रेसच्या पराभूत उमेदवार मंगल नारायणकर यांच्यासह त्यांच्या पतीने जिल्हाधिकार्यांकडे केलीय.
याबरोबरच संगीता कुचे यांचे अंबड आणि औरंगाबाद या दोन ठिकाणच्या मतदार यादीत नाव असल्याची तक्रार देखील जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये जालना जिल्ह्यातील अंबड नगरपरिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपचे 6 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षांच्या दोन नगरसेवकांना सोबत घेऊन भाजपने या नगरपरीषदेत सत्ता स्थापन करत संगीता कुचे अंबड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या.