कोल्हापूर- आर्थिक फायद्यासाठी कोल्हापुरातल्या अंबाबाईची महालक्ष्मी केली गेली, असा आरोप अंबाबाईच्या भक्तांचा असतानाच मुंबई – कोल्हापूर या महालक्ष्मी एक्स्प्रेसचे नाव बदलून ते अंबाबाई एक्स्प्रेस करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेने केली असून या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्यावतीने कोल्हापूर रेल्वेस्थानकावर आंदोलन करण्यात आले.
यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, कोल्हापूरच्या अंबाबाईला घागरा नेसवण्याच्या प्रकरणी पुजारी अजित ठाणेकर यांनी माफीनामा सादर केला आहे, मात्र अंबाबाईचे भक्त मंदिरातून पुजारी हटवण्यावर ठाम असल्याचेही दिसून येते.