भुसावळ । जिल्हा पोलीस दलात एकीकडे सीसीएनएस प्रणालीचे वारे वाहत असतानाच जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अकस्मात मृत्यूची नोंद वर्ग होण्यास तब्बल नऊ महिने लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
तळवेलच्या इसमाचा विषारी औषध सेवनाने मृत्यू जानेवारी महिन्यात झाल्यानंतर ही नोंद जिल्हा पेठ पोलिसांकडून सप्टेंबर महिन्यात वरणगाव पोलिसात वर्ग झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कैलास राजमल सूर्यवंशी (45, तळवेल) याचा 8 जानेवारी 2017 रोजी विषारी द्रवपदार्थ सेवन केल्याने जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. अकस्मात मृत्यूची नोंद जिल्हा पेठ पोलिसात झाल्यानंतर ती मंगळवारी वरणगाव पोलिसात वर्ग झाली. नोंद उशीरा का वर्ग झाली ? याचे कारण कळू शकले नाही.