अकृषि विद्यापीठांच्या बृहत आराखडयांबाबत प्र-कुलगुरुंची बैठक

0

जळगाव- महाराष्ट्रातील सर्व अकृषि विद्यापीठांच्या बृहत आराखडयांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करुन अंतिम स्वरुप देण्यासाठी शनिवार पासून सुरु झालेल्या राज्यातील विविध विद्यापीठांच्या प्र-कुलगुरुंच्या बैठकीत आज रविवार दोन विद्यापीठांसमवेत तज्ज्ञ समितीने संवाद साधला.

राज्यस्तरीय विद्यापीठीय पंचवार्षिक बृहत आराखडा छाननी व पूनर्तपासणी तज्ज्ञ समिती सदस्यांनी शनिवार 1 सप्टेंबर रोजी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव या तीन विद्यापीठांच्या प्र-कुलगुरू व त्यांचे प्रतिनिधी यांच्या समवेत तर आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती या तीन विद्यापीठांच्या प्र-कुलगुरु, व त्यांचे प्रतिनिधी यांच्या समवेत अनिल राव, डॉ.बी.एन.जगताप, आनंद मापूसकर, डॉ.धनजंय माने या तज्ज्ञ समिती सदस्यांनी बृहत आराखडयाविषयी चर्चा केली.

पंचवार्षिक व सन 201–2023 चा बृहत आराखडा तयार करण्याकरीता याआधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे बौठका आयोजित करण्यात आल्या होत्या. दोन दिवस चाललेल्या या बौठकीमध्ये यापूर्वी दिलेल्या मार्गदर्शनानुसार बृहत आराखड¶ात दुरूस्त्या तसेच काही मुद्दयांवर सविस्तर चर्चा झाली. आज उशिरापर्यंत चाललेल्या बौठकीत बृहत आराखड¶ाचे कामकाज पूर्ण होईल यानंतर तज्ज्ञ समिती शासनास हा बृहत आराखडा सादर करणार आहे.

दोन दिवस चाललेल्या या बैठकीत प्रा. चंद्रशेखर भुसारी, प्र-कुलगुरु, प्रा. मनिष उत्तरवार, संचालक, नवोपक्रम व नवसंशोधन मंडळ, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, प्रा.अशोक तेजनकर, प्र-कुलगुरू, प्रवीण वक्ते,प्रा.व्ही.एम.कन्हाळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, प्रा. राजेश जयपूरकर, प्र-कुलगुरू, सौ.सुलभा पाटील, उपकुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती, डॉ.एस.जे.वाडेकर, विट्ठल चालिकवार, उपकुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, प्रा.पी.पी.माहुलीकर, प्र-कुलगुरू, डॉ.समीर नारखेडे, डॉ.मनोज पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी सहभाग नोंदविला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संशोधन विभागाचे उपकुलसचिव जी.एन.पवार,  अनिल मनोरे, सहायक कुलसचिव के.सी.पाटील, सहायक शरद ठाकरे, जितेंद्र शिंदे, महेश पाटील, एस.एस.पाटील, दीपक गावित आदींनी याबैठकीत करीता सहकार्य केले.