अकोला – वाडेगाव येथील माजी सरपंच बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. बाळापूर तालुक्यातील हे माजी सरपंच आसिफ खान मुस्तफा खान हे 16 ऑगस्टपासून बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी त्यांच्या मुलाने १७ ऑगस्टला बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आसिफ खान हे १६ ऑगस्टला घरातून स्वत:ची कार (एमएच -०१- सीए १३३९) घेऊन बाहेर गेले होते. मात्र, ते काही परत आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी अकोला येथे रात्री ८ वाजेपर्यंत शोध घेतला. शेख यांचा कोठेच पत्ता लागत नसल्याने त्यांच्या मुलाने बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, आसिफ खान यांची कार म्हैसांग जवळ आढळल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.