मुंबई : अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. त्याच्या लग्नाला आज १८ वर्षे पूर्ण झाली म्हणून अक्षयने ट्विंकलसोबतचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अक्षयने शेअर केलेल्या व्हिडिओत ट्विंकल अक्षयला पंच मारताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत त्याने ट्विकंलबरोबर १८ वर्षे कशाप्रकारे काढली, हे सांगितले आहे. ‘तुम्ही मार्शल आर्ट एक्सपर्ट असताना जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीला काही क्लुप्त्या सांगता, तेव्हा ती तुम्हालाच ‘पंचिंग बॅग’ म्हणून वापरते. अशाच पद्धतीने १८ वर्ष निघून गेलीत…’ असे अक्षयने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन दिले आहे.