अक्षय काळे यांचे अपघाती निधन

0

मुंबई | स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कर्मचारी अक्षय काळे यांचे मुंबई – पुणे महामार्गावर अपघातात दुर्दैवी निधन झाले. ते 21 वर्षांचे होते. मेहनती, मनमिळावू आणि निष्ठेने काम करणा-या अक्षय काळे यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात त्याची आई व बहिण आहे. अक्षय यांच्यावर त्यांच्या मूळ गावी सातारा येथे शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

अक्षय काळे यांच्या निधनाबद्दल स्मारक कर्मचारी तसेच पदाधिकारी यांनी शोक व्यक्त केला. त्यानिमित्त स्मारकात शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सदस्या स्वामिनी सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, व्यवस्थापक संजय चेंदवणकर आदी तसेच कर्मचारी वर्ग यांनी श्रद्धांजली अर्पण केली.