अक्षय कुमार ट्विंकलला म्हटला पुन्हा चित्रपट करु नको

0

मुंबई: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि त्याची पत्नी व अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडपं आहे. हा जोडपं नेमीचं काहीना काही कारणाने चर्चेत असतं. नुकतेच ट्विंकलने तिचे लिहिलेले पुस्तक ‘Pyjamas Are Forgiving’ लॉन्च केले.

एका मुलाखतीत, ट्विंकलने अक्षयसोबतचा एक किस्सा शेअर केला. अक्षय नेहमी माझ्या अभिनयाची खिल्ली उडवत असतो आणि तू पुन्हा चित्रपटात अभिनय करु नको असा सल्ला देतो. त्याचे म्हणणे आहे, की ट्विंकलला अभिनय जमत नाही. तिचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले आहेत, असे तिने सांगितले.

मात्र, यावर ट्विंकलने आपले मत व्यक्त केले आहे. तिला स्वतःला सुद्धा वाटते, की ती अभिनयासाठी बनलेली नाहीये. त्यामुळे ती अभिनय सोडून लिहिण्यावर जास्त लक्ष देते.