अखिलेश यादव ह्या विद्यार्थ्याची आंतर विदयापीठ जलतरण स्पर्धेसाठी निवड

0

जळगाव :  जैन विदयापीठ, बंगलोर (कर्नाटक राज्य) या ठिकाणी आन्तर विदयापीठ जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सदर स्पर्धेसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे के.सी.ई.सोसायटीचे शिक्षण शास्त्र व शरीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचा विद्यार्थी अखिलेश यादव या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे.या खेळाडूस प्रा. पंकज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले व प्रा.प्रविण कोल्हे यांचे सहकार्य लाभले.

सदर विद्यार्थ्यांचे के.सी.ई.सोसायटीचे, अध्यक्ष नंदकुमार जी. बेंडाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.अशोक राणे, प्रा.निलेश जोशी, प्रा. अंजली बन्नापुरे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.