जळगाव- अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या समाजातील ३३ आदर्श शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा बुधवारी सायंकाळी शहरातील जगताप मंगल कार्यालयात पार पडला यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर लोटन जगताप होते़ याप्रसंगी व्यासपीठावर ग़भ़तल्हार, मुकूंद मेटकर, विवेक जगताप, मनोज भांडारकर, सतीष जगताप, जगदीश जगताप, अंजली बाविस्कर, डॉ़ मनिषा जगताप, संजय बोरसे आदी उपस्थित होते़ कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलनाने करण्यात आल्यानंतर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह केरळमधील पुरात मयत झालेल्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली़ त्यानंतर उपस्थिती मान्यवरांनी मनोगत व्यक्ती केली़ प्रास्ताविक दत्तात्रय कापूरे यांनी केले़ कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी बजावणाºया शिंपी समाजातील आदर्श ३३ शिक्षक-शिक्षिकांचा शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र तसेच गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
डॉ़ मनिषा जगताप, अश्विनी खैरनार, संजय बोरसे, कैलास शिंपी, उखर्डु चव्हाण, रवींद्र संदानशिवे, राकेश शिंपी, भारती निकुंभ, प्रशांत गांगुर्डे, जानकी गाढे, दीपक शिंपी, पौर्णिमा शिंपी, संजय निकुं भ, महेश शिंपी, सुरेखा कापूरे, सुनीता शिंपी, माधूरी चव्हाण, दिपीका शिंपी, दिपाली शिंपी, जया शिंपी, ऋषिकेश शिंपी, प्रतिभा शिंपी, कामिनी शिंपी, प्रतिभा प्रशांत शिंपी, पल्लवी शिंपी, स्रेहा शिंपी, हर्षलता शिंपी, वैशाली जगताप, भावना शिंपी, माधूरी मेटकर, रेखा शिंपी तसेच ज्योती जगताप या समाजातील आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज भांडारकर यांनी केले तर आभार संजय बोरसे यांनी मानले़ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परेश जगताप, रामकृष्ण शिंपी, दिलीप भामरे, शिवदास शिंपी, शिवाजीराव शिंपी आदींनी परिश्रम घेतले.