मुंबई । डॉ. प्रकाश वझे क्रीडा प्रतिष्ठान आणि रावसाहेब बाळाराम ठाकूर विद्यामंदीर यांच्या संयुक्त विद्यमाने 9 आणि 10 डिसेंबर रोजी सहाव्या निर्मला वझे स्मृती अखिल भारतीय फिडे मानाकंन जलद बुद्धिबळ स्पर्धा आणि दुसर्या सिमा जोशी स्मृती ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
वामनराव मुरंजन शाळेच्या सभागृहात रंगणारी ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. निर्मला वझे स्मृती स्पर्धेत एकंदरीत एक लाख रुपयांचे रोख पुरस्कार देण्यात येतील. या स्पर्धेतील विजेत्याला 20 हजार रुपयांचा पुरस्कार मिळेल. याशिवाय विविध वयोगटातील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येतील. याशिवाय ब्लिट्झ स्पर्धेतही 25 हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.