अखिल भारतीय साहित्य पुरस्काराने निकम सन्मानित

0

चाळीसगाव। मराठी वाड्ःमय परिषद बडोदा व श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापीठ मराठी विभाग बडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय स्तरावर कथा स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती.

या स्पर्धेसाठी चाळीसगाव येथील पत्रकार कवी गौतमकुमार निकम यांनी सामाजिक विसंगतीवर भाष्य करणारी कोष हि कथा सादर केली होती. सदर स्पर्धेसाठी अखिल भारतीय स्तरावर एकूण 105 स्पर्धकांनी भाग नोंदविला होता. त्यातून कवी गौतमकुमार निकम यांच्या कोष या कथेची प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली. 11 रोजी बडोदा येथे भव्य अभिरुची गौरव पुरस्कार वितरण समारंभ प्रा.प्रदीप डहाके, डॉ.अतुल जोशी, संस्थेचे अध्यक्ष दिलीप खोपकर, डॉ.प्रा.वनिता ठाकूर, डॉ.धनंजय मुजमदार आदि उपस्थित होते.