अखेरची कसोटीही आम्ही जिंकणारच – विराट

0

मेलबर्न : मेलबर्न कसोटीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघात उत्साह संचारला आहे. या विजयानंतर कर्णधार विराट कोहलीनेही मालिका जिंकण्याचा आपला इरादा स्पष्ट केलाय. ‘आम्ही आता थांबणार नाही. सिडनीतील चौथी आणि अखेरची कसोटीही आम्ही जिंकणारच, असं विराटनं म्हटलंय.

मेलबर्न कसोटीतील भारतीय संघाच्या उत्तम कामगिरीचं कोहलीने कौतुक केलं आहे. खास करून सामनावीर जसप्रीत बुमराह, चेतेश्वर पुजारा आणि करिअरमधील पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या मयांक अग्रवाल यांची कोहलीने स्तुती केली. ‘मेलबर्नमधील विजयाने आमचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे सिडनीतील चौथ्या कसोटीत आम्ही सकारात्मक विचारांनी मैदानात उतरू. या चौथ्या सामन्यासह मालिकाही आम्हाला जिंकायची आहे’, असं विराटने सांगितलं. ‘या दौऱ्यात विजय मिळवलेल्या दोन कसोटी सामन्यात आम्ही दमदार कामगिरी केली आहे. यामुळे आम्ही बॉर्डर- गावसकर चषक सुरक्षित ठेवू शकलो. मात्र, लक्ष्य अजून पूर्ण झालेलं नाही’, असं विराटने स्पष्ट केलं.