सावदा। सावदा येथील खंडेलवाल पिता पुत्रा विरुद्ध सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अखेर 16 रोजी रात्री उशिरा नायगाव येथील केळी एजंट यांचे फिर्यादीवरुन सावदा पोलीसस्थानकात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील जय बजरंग केला एजन्सीचे संचालक अनिल सुधाकर महाजन यांनी 6, 7, व 8 मे 2017 तसेच 8 जून 2017 यादिवशी ऐनपुर येथील कैलास रघुनाथ पाटील व वासुदादा उर्फ रविंद्र सीताराम महाजन तसेच दोधा येथील प्रवीण पाटील यांचा केळी रक्कम रुपये 8 लाख 63 हजार 830 रुपये किंमतीचा माल घेतला व सावदा येथील खंडेलवाल ट्रान्सपोर्टवर त्यांचे संचालक कैलास दुलीचंद खंडेलवाल, मयूर कैलास खंडेलवाल, तसेच अनिस उर्फ अनियास मारहाणीची धमकी, 8 लाख 63 हजार 830 रुपयांची फसवणूक प्रकरणी कैलास खंडेलवाल, मयूर खंडेलवाल, अनिस उर्फ अनि यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एपीआय राहुल वाघ हे करीत आहे.