अखेर राज्य सेवा आयोगाची पूर्व परीक्षा झाली

जळगाव – गेल्या २ वर्षांपासून ५ वेळा पुढे ढकलण्यात आलेली महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाची पूर्व परीक्षा अखेर रविवारी पूर्णत्वास आली. जळगावत शहरातील एकूण १६ केंद्रांवर आज परीक्षा घेण्यात आली. ज्यातील पहिल्या सत्रात ३८६० विद्यार्थांनी परीक्षा दिली तर दुसऱ्या सत्रात ३८३३ विद्यार्थांनी परीक्षेसाठी हजेरी लावली.त्याच प्रमाणे प्रथम सत्रात एकूण २४०१ विद्यार्थी  तर द्वितीय सत्रात २४२८ विद्यार्थी अनुपस्थित होते.