अखेर ‘त्या’ आमदाराने पुत्राला केले पोलिसांच्या स्वाधीन

0

भोपाळ-काँग्रेस नेते आणि खासदार ज्योतिरादित्य सिंधीया यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी मध्यप्रदेशातील भाजपच्या एका आमदार पुत्राने दिली होती. धमकी देणाऱ्याचे प्रिन्सदिप खटीक आहे. तो भाजपाच्या आमदार उमा देवी खटीक यांचा पुत्र आहे. या प्रकरणावरून मध्यप्रदेशमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आमदार उमा देवी खटीक यांनी मुलाला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

या प्रकरणाचा माझ्या पक्षाशी काहीही संबंध नाही, पण त्याचे वागणे चुकीचे होते. मी स्वतःच त्याला पोलिसांच्या स्वाधीन करीत असल्याचे आमदार उमा देवी खटीक म्हणाल्या.

प्रिन्सदिप लालचंद याने फेसबुकवर पोस्ट टाकून, ज्योतिरादित्य यांचा एकेरी उल्लेख करत बुंदेलखंडच्या झाशीच्या राणीचा ज्याने खून केला त्या जिवाजी रावचे तुझ्या अंगात रक्त आहे, जर तू हटा मध्ये प्रवेश करत उपकाशीला अपवित्र करण्याचा प्रयत्न केलास तर गोळी झाडेन, एकतर तुझा मृत्यू नाहीतर माझा मृत्यू होईल, अशा शब्दांत धमकी दिली होती.

सिंधिया हे येत्या 5 सप्टेंबरला हटा जिल्ह्यामध्ये एका सभेला संबोधित करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही धमकी देण्यात आली होती.