…अखेर ‘त्या’ तरूणाची मावळली प्राणज्योत

0

जळगाव ।महामार्गावरील कालिंकामंदीराजवळ हॉटेल जान्हवी कडून येत असलेल्या दुचाकीस्वाराला ट्रकने धडक दिली होती. हा अपघात दि.8 रोजी रात्री 7.45 वाजता घडला. यात अयोध्यानगरातील सन्नी उर्फ प्रफुल्ल खरोटे हा तरुण गंभीर जखमी झाला होता. सन्नीचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. दरम्यान दहावीत असलेला लहान भाऊ शुभम याने भावाचे दुःख डोळ्यात ठेवून पेपर सोडविला. त्यानंतर सन्नी यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.अयोध्यानगरातील सन्नी उर्फ प्रफुल्ल बळीराम खरोटे (वय 19) हे मयत तरुणाचे नाव आहे. दि.8 रोजी हॉटेल जान्हवीकडून अयोध्यानगरच्या दिशेने सन्नी दुचाकी क्रमांक एम.एच.19 बी.बी.2593 ने जात होता. याचवेळी भरधाव वेगाने भुसावळ कडून जळगावकडे ट्रक क्रमांक एम.एच.18 एम.5701 ने त्याला धडक दिली. या अपघातामध्ये सन्नीची दुचाकी ट्रकच्या चाकाखाली त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर खाजगी रुग्णालयाल उपचार सुरु होते. त्याचा आज सकाळी मृत्यू झाला.

भाऊ गेल्याचे दु:ख डोळ्यात साठवत सोडविला पेपर
सन्नी हा अंजिठा चौफुलीजवळ एका नाश्ताच्या गाडीवर कामाला होता. वडिल बळीरामर गणपत खरोटे हे एमआयडीसीमध्ये एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. आई भारती गृहिणी असून लहान शुभम दहावीला आहे. सन्नीचा मित्र परिवारही मोठा आहे. त्यामूळे त्याची मृत्यूची वार्ता समजतातच नातेवाईकांसह मित्रपरिवारांनी रुग्णालयात गर्दी केली. यावेळी नातेवाईकांनी मनहेलविणारा आक्रोश केला.

सन्नी याचा लहान भाऊ शुभम हा सिध्दीविनायक शाळेत दहावी आहे. त्याचा दहावीचा पेपर आज आर.आर. शाळेत होता. सकाळी मोठा भाऊ सन्नी याला काळाने हिराविले. ह्या दुःखाचे अश्रु डोळ्यात थांबवून शुभमने दहावीचा इंग्रजीचा पेपर सोडविला. पेपर सोडवून घरी आल्यानंतर आपल्याला भावाला भावपूर्ण निरोश शुभमने दिला. यावेळी समाधानला मित्रांनीही त्याला निरोप देण्यासाठी एकच गर्दी केली होती.