नवी दिल्ली । सौरव गांगुलीच्या नाराजीनंतर आता दुलिप ट्रॉफी स्पर्धेचा बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये समावेश करण्यात आला आहे. आता या स्पर्धेतील लढती 7 ते 29 सप्टेंबर दरम्यान उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ आणि कानपुरमध्ये खेळवण्यात येतील. स्पर्धेत इंडिया रेड, इंडिया ब्ल्यू आणि ग्रीन संघ सहभागी होतील. बीसीसीआयने स्पर्धेतील लढतींचे वेळापत्रक तयार केले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 26 ऑक्टोबर रोजी होणारा सामना कानपुरऐवजी लखनऊमध्ये खेळवणार का या प्रश्नावर उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेच्या पदाधिकार्याने सांगितले की, आयसीसीचे पथक 6 सप्टेंबर रोजी दोन्ही मैदानांची पहाणी करणार आहे त्यानंतर सामन्याच्या ठिकाणाचा निर्णय होईल. मागील वर्षी पहिल्यांदाच दुलिप ट्रॉफीमधील सामने प्रकाशझोतात गुलाबी चेंडूने खेळवण्यात आले होते. हे सामने ग्रेटर नोएडात पार पडले. बीसीसीआयमधील काही अधिकार्यांनी यावर्षी या स्पर्धेला स्थानिक स्पर्धांच्या वेळापत्रकामधून वगळले होते. त्यानंतर तांत्रिक समितीचे प्रमुख असलेल्या सौरव गांगुलीने त्यासंदर्भात जोरदार टिका केली होती.
स्पर्धेतील सहभागी संघ
इंडिया रेड : अभिनव मुकुंद (कर्णधार), प्रियांक पांचाळ, सुदीप चॅटर्जी, इशांक जग्गी, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, बाबा इंद्रजीत, के.गौतम, कर्ण शर्मा, तुलसी थंपी, धवल कुलकर्णी, अशोक दिंडा, राहुल सिंग, चामा मिलिंद
इंडिया ग्रीन : पार्थिव पटेल (कर्णधार), मुरली विजय, आर. समर्थ, पी चोपडा, श्रेयस अय्यर, करूण नायर, अंकित बवाना, शाहबाज नदीम, परवेझ रसूल, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, सिद्धार्थ कौल, मयंक डागर, नितीन सैनी, अनिकेत चौधरी.
इंडिया ब्ल्यू : सुरेश रैना (कर्णधार), समित गोहिल, के.एस.भरत, ए.आर ईश्वरन, मनोज तिवारी, दीपक हुड्डा, विजय शंकर, ईशान किशन, जयंत यादव, भार्गव भट्ट, के.एम.गांधी, ईशांत शर्मा, अंकित राजपूत, एस. कामत, जयदेव उनाडकट.
स्पर्धेचे वेळापत्रक
सामने तारिख स्थान
इंडिया रेड विरुद्ध इंडिया ग्रीन 7 ते 10 सप्टेंबर लखनऊ
इंडिया रेड विरुद्ध इंडिया ब्ल्यू 13 ते 16 सप्टेंबर कानपुर
इंडिया ब्ल्यू विरुद्ध इंडिया ग्रीन 19 ते 22 सप्टेंबर कानपुर
अंतिम सामना 25 ते 29 सप्टेंबर लखनऊ