अखेर पंढरपूरचा प्रचार संपला रे भो

पंढरपूर : संपूर्ण राज्यात कोरोनाचा कहर सुरु असताना त्याची वक्रदृष्टी राज्याच्या ज्या विधानसभा क्षेत्रावर पडली नाही त्याच नाव आहे पंढरपूर. कारण तिथे सुरु होती विधानसभेची पोट निवणूक ज्याचा प्रचाराची सांगता झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, जयंत पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह दिग्गज मंडळी मुक्कामी होती.तर त्याच बरोबरीने मंत्री धनंजय मुंढे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे ,आ.अमोल मिटकरी,रूपाली चाकणकर,तसेच सेनेचे मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील तर कॉंग्रेसचे नाना पटोले या सारखे दिग्गज प्रचारासाठी आले. भाजपाने या निवडणुकीच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आ. सुभाष देशमुख, विजय देशमुख, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, मोहिते पाटील, खा.निंबाळकर, खा.जयसिधेश्वर यासह आ. प्रशांत परिचारक यांनी प्रचाराची धुरा सांभाळली.

पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आ. भारत भालके यांचे निधन झाल्याने पोटनिवड होत आहे. १७ एप्रिल रोजी मतदान होत असून मतदार राजा कोणाला कौल देतो हे २ मे रोजीच्या मतमोजणीत स्पष्ट होईल.