अखेर बसस्थानक परीसरातील खड्ड्यांची समस्या मार्गी

0

शहादा। येथील बसस्थानक बाहेरील मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे होती या संदर्भात दै जनशक्तीने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन शहादा नगरपालिका सत्ताधारींनी ही खड्याची समस्या तातडीने मार्गी लावल्याने दै. जनशक्तीचे व पालिकासत्ताधार्‍यांचे वाहनधारकांकडून व प्रवासी वर्गाकडून आभार व्यक्त होत आहे. शहादा बसस्थानक ते पुरूषोत्तम मार्केट पर्यंतचा रस्त्यावर मोठमोठे खड्डे होती बसस्थानक बाहेर तर रस्ताचीअतीशय दैनिय परिस्थिती होती. दररोज ग्रामीण भागात शेकडो बस जा-ये करतात. तसेच शहरातील शाळा महाविद्यालयात हजारो विद्यार्थी ये-जा करतात.

ठेलाचेही प्रश्‍न मार्गी लावा
बसस्थानकातुन बाहेत पडताच या खड्यांची मोठी डोकेदुखी ठरत होती. हा मुख्य रस्ता असल्याने वाहन धार, विद्यार्थी, प्रवाशीवर्ग सगळ्यांनाच या खड्यांचा सामना करावा लागत होता. आता नगरपालिकाने ह्या खड्यांमधे खडी मुरूम टाकून समस्या मार्गी लावली आहे. आता बसस्थानक बाहेरील मुख्य रस्त्यावर ठेला लॉरी सर्रास रोडावर उभी करून विक्री करतात. त्यामुळे महामंडळाच्या बस व वहानांना डोके दुखी ठरत आहे. पालीका व पोलीस प्रशासनाने ही समस्या मार्गी लावावी, अशी अपेक्षा वाहन धारकांकडून जोर धरत आहे.