मुंबई: कॉंग्रेस नेते मंत्री विजय वडेट्टीवार हे त्यांना मिळालेल्या खात्यावरून नाराज होते. त्यामुळेच त्यांनी खातेवाटप झाल्यानंतरही पदभार स्वीकारलेला नव्हता. खाते आणि त्यांना देण्यात आलेल्या बंगल्यावरून ते नाराज होते. अखेर त्यांची नाराजी दूर झाली आहे. प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मध्यस्थी करून त्यांची नाराजी दूर केली आहे. त्यामुळे आजच ते आपला पदभार घेणार आहे. वडेट्टीवार यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी देखील चर्चा केली आहे. त्यानंतर त्यांची नाराजी दूर झाली आहे.
वडेट्टीवार त्यांना देण्यात आलेल्या बंगल्यावरून नाराज असल्याचे सांगण्यात आल्यानंतर त्यांना बंगला बदलवून देण्यात आला. त्यांच्या नाराजीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल वक्तव्य केले होते. त्यांना देण्यात आलेल्या खात्याचा उल्लेख भूकंप पुनर्वसन असे झाले होते. मात्र ते मदत पुनर्वसन होते. ते दुरुस्त करण्यात आले आहे.