अखेर रावेर तहसीतर्फे बेडसाठी हेल्पनंबर जारी

बर्‍हाणपूरात ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने रुग्णात झाला होता प्रचंड संभम्र

रावेर (शालिक महाजन) : बर्‍हाणपूर येथे ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने प्रचंड संभ्रम निर्माण झाला होता. अखेर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रुग्णांचा संभ्रम दूर करण्यासाठी जिल्ह्यात बेड शिल्लक असल्याचे माध्यमांना सांगताच स्थानिक तहसील प्रशासन खळबळुन जागे झाले व मंगळवारी रावेर तालुक्यातील नागरीकांसाठी बेडची माहिती व्हावी म्हणून 02584-250573 हेल्पनंबर इन्सिडंन्ट कमांडर तथा तहसीलदार यांनी जारी केला आहे. नागरीकांना उउउ.ऊकउ.ऊउकउ येथे ऑक्सिजन संदर्भात माहिती घेता येवू शकणार आहे.

नोडल अधिकारी बेड मॅनेजमेंटर नियुक्ती
दरम्यान बातम्यांची दखल घेऊन तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी मंगळवारी वैद्यकीय अधिकारी यांच्या नियंत्रणात ऑक्सिजन बेड संदर्भात हेल्पनंबर जारी केला तर रुग्णांना अधिक माहिती व्हावी म्हणून नोडल अधिकारी बेड मॅनेजमेंटर म्हणून गटशिक्षणधिकारी शैलेश दखणे यांची नियुक्ती केली आहे. हेल्पलाईन कक्षाचे कामकाज बघण्यासाठी किशोर पवार यांची डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती केली आहे.

रुग्णांनी घाबरून जावू नये : जिल्हाधिकारी
शासनाच्या आदेश्यावरुनच मध्य प्रदेशच्या बर्‍हाणपूरला ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला आहे. कोरोना बाधीत रुग्णानी घाबरून जाण्याचे कारण नाही. जळगावमध्ये पुरेसे बेड उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी ‘जनशक्ती’शी बोलतांना सांगितले. ते म्हणाले की, शासनाच्या आदेश आहे की, राज्यसच्या बाहेर ऑक्सिजन पुरवठा करू नये म्हणून मध्य प्रदेशच्या बर्‍हाणपूरमध्ये ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला आहे. आधी 160 ऑक्सिजन सिलेंडर दररोज पुरवठा केला जात होता त्यामुळे जिल्ह्यात अडचण निर्माण होत होती परंतु आता पूर्णपणे ऑक्सीजन पुरवठत्त बंद करण्यात आला आहे. ऑक्सिजन न मिळणार्‍या व त्रास होणार्‍या कोरोना रुग्णांसाठी गोदावरी हॉस्पिटलमध्ये 50 बेड उपलब्ध आहे तसेच भुसावळमध्येदेखील इतर बेड उपलब्ध असल्याचे राऊत यांनी सांगितले.

जिल्ह्यात पुरेसे बेड : डॉ.राऊत
डॉ.राऊत म्हणाले की, बर्‍हाणपूर जिल्हाधिकारी प्रवीण सिंग यांच्याशी देखील माझे बोलणे झाले. त्यांना सांगितले की, एव्ळढे दिवस आम्ही बर्‍हाणपूरमशध्ये ऑक्सिजन सिलेंडर दिले परंतु आता शासनाचा आदेश आल्याने ऑक्सीजन पुरवठा बंद करीत आतो. आपणास ऑक्सिजनची अत्यंत गरज असेल तर मध्य प्रदेश शासनाने महाराष्ट्र शासनाची परवानगी घ्यावी, आदेश आल्यास ऑक्सिजन पुरवठा पूर्वरत केला जाईल त्यामुळे रावेर, मुक्ताईनगर, यावल भागातील कोरोनाबाधीत रुग्णांनी मध्यप्रदेशच्या बर्‍हाणपूरमध्ये दाखल करून घेतले जात नसेल तर घाबरून जाऊ नका, जिल्ह्यात पुरेसे बेड उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत ‘जनशक्ती’शी बोलताना म्हणाले.