अमळनेर । भारत छोडो आंदोलनास 75 वर्ष पूर्तीनिमित्ताने नंदुरबार मुंबई असा प्रवासास निघालेली अगस्त क्रांती लोकजागर यात्रेचे आगमन अमळनेरात झाले. याप्रसंगी युवा संकल्प जागर परिषद येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात झाली. परिषदेची सुरुवात देशभक्ती व समाज प्रबोधनपर गीताने झाली. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी श्रमसाफल्य एज्यु सोसायटी अमळनेरचे चेअरमन सुभाष भांडारकर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनीता गांधी, विलास किरोते, प्रतिभा शिंदे, चेतन सोनार, भारती गाला व्यासपीठावर उपस्थित होते.
यांनी घेतला सहभाग
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.पी.एस.पाटील यांनी केले. कार्यक्रमास राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. यात डॉ. सुरेश खैरनार, अल्लाउद्दीन शेख यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन भांडारकर यांनी या यात्रेचे स्वागत करत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अविनाश सोनवणे व रेणुका पाटील यांनी तर आभार भूषण साळुंखे, रोहन सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपाल नेवे, दर्शना पवार, प्रा.भरत खंडागळे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीत गायनाने परिषदेचा समारोप करण्यात आला.