‘अग्नि-2’ची चाचणी यशस्वी

0

मध्यम पल्ल्याची अणवस्त्रे वाहून नेण्यास सक्षम

नवी दिल्ली : भारताने मंगळवारी मध्यम पल्ल्याच्या अणवस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या अग्नि-2 क्षेपणास्त्राची घेतलेली चाचाणी यशस्वी ठरली. ओदिशाच्या तटावरील अब्दुल कलाम बेटावर सकाळी 8.38 च्या सुमारास ही चाचणी घेण्यात आली. मोबाइल लाँचरवरुन जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे.

पल्ला 2 हजार किलोमीटरचा
आयआरबीएम श्रेणीतील या क्षेपणास्त्राचा सैन्य दलात समावेश करण्यात आला असून, लष्कराच्या स्ट्रॅटजिक फोर्सेस कमांडने ही चाचणी घेतली. डीआरडीओने चाचणीसाठी सहकार्य केले. 20 मीटर लांबीच्या अग्नि-2 बॅलेस्टिक मिसाइलमध्ये 1 हजार किलोचे पेलोड वाहून नेण्याची क्षमता आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला 2 हजार किलोमीटरचा आहे. अग्नि दोन टू स्टेज मिसाइल असून त्यात अत्याधुनिक नॅव्हीगेशन सिस्टीम (दिशादर्शन) आहे. या चाचणीसाठी बंगालच्या सागरात नौदलाची दोन जहाजे तैनात करण्यात आली होती. रडारच्या माध्यमातून या संपूर्ण चाचणीचे नियंत्रण करण्यात आले.

अग्नि मालिकेतील पाच क्षेपणास्त्रे
(मारक क्षमता किलोमीटरमध्ये)
अग्नि-1 : 700
अग्नि-2 : 2000
अग्नि-3 : 3000
अग्नि-4, 5 : 5000
संपूर्ण चीन, पाकिस्तान अग्नि 4 आणि 5च्या टप्प्यात